जळगाव: देशभरात कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याकाळात मजूर तसेच हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विविध सेवाभावी संस्था यासाठी पुढे येत असताना आता निस्वार्थ जनसेवा फुड बँक , पोलिस प्रशासन व जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून अन्नदान करण्यात येत आहे.
गरजूंना फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. 16 एप्रिलपर्यंत फूड पॅकेट्स वितरित केले जाणार आहे. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलाणी, जिल्हा न्यायाधीश पी.वाय.लाडेकर, जिल्हा न्यायाधीश 2 आर.जे.कटारिया, जिल्हा सरकारी अभियोक्ता के.जे.ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव के.एच.ठोंबरे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण जबाबदारी न्यायाधीश वर्गाने व्यक्तिशः घेतली आहे. निस्वार्थ जनसेवा फूड बँक एनजीओ आणि पोलीस प्रशासनाचीही यासाठी मदत मिळत आहे.