‘नीट’ची तारीख जाहीर

0

मुंबई : ‘नीट’च्या परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा यंदा 6 मेरोजी होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.

नीटसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कलापासूनच सुरू झाली असून, 9 मार्चला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे. रविवार, 6 मेरोजी सकाळी 10 वाजता ही परीक्षा घेतली जाणार आहे.