नीरावागजच्या सरपंचपदी मिनाक्षी देवकाते

0

पिंपळी : नीरावागजच्या सरपंचपदी मिनाक्षी देवकाते यांची निवड झाली आहे. सरपंच पूनम देवकाते यांचा आठ महिन्यांचा ठरलेला कालावधी संपल्यानंतर मिनाक्षी देवकाते यांचा सरपंचपदासाठी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी उदयसिंह कदम यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच पूनम देवकाते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी नवनिर्वाचित सरपंच देवकाते यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक मदन देवकाते, सरपंच पूनम देवकाते, चंदर देवकाते, गणपत देवकाते, केशव देवकाते, विलास देवकाते, राजाभाऊ देवकाते, पोपट देवकाते, डॉ. सतीश देवकाते, ललिता भोसले, उपसरपंच शुभांगी बुरुंगले, पोलीस पाटील अमित देवकाते, अ‍ॅड. हेमंत देवकाते, संचालक दूध संघ संजय देवकाते, प्रकाश देवकाते आदी यावेळी उपस्थित होते. गावात पाणीयोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, आरोग्यदायी वातावरणात राहण्यासाठी स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे मत देवकाते यांनी दिले.