तळोदा । तळोदा तालुक्यात दिनांक 3 च्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यात तालुक्यातील40 हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे, बाधित गावं- रेवानगर सरदारनगर, नर्मदानगर, दलेलपूर, मोड, बोरद प्रतापूर, तळवे, रांझणी, चिनोदा,सिलिंगपूर तरहवाद खरवड, खेडले, मोरवड, चोगाव,धानोरा, आमलाड, उमरी, कलमसरे, सोयाबीन 22 हेक्टर, कापूस 120 हेक्टर,ऊस 10 हेक्टर,मका 28 हेक्टर, पपई 42 हेक्टर, केळी 64 हेक्टर एकूण 286 हेक्टर जमीन खरडुन अथवा वाहून अंदाजे क्षेत्र 40 हेक्टर आर क्षेत्र बाधित झाले आहे.
8 घरे पूर्णतः नष्ट
दरम्यान नुकसान बाबत सविस्तर पंचनामे करून अंतिम अहवाल पुढील 10 दिवसात पूर्ण करण्याबाबत आवश्यक त्या सूचना तहसीलदार योशेष चन्द्रे यांनी दिले आहेत.तसेच तळोदा तालुक्यातील व शहरातील घर व गुरे यांची आकडेवारी पुढे आली असून एकूण 8 घरे पूर्णतः नष्ट झाले असून अंशतः 778 घरे तर मोठ्या जनावरामध्ये मयतची एकूण पाच संख्या आहे. कोंबड्या 78 तर बकर्या 10 इतके नुकसान झाले आहे.