नुकसानीची खासदार रक्षा खडसेंनी केली पाहणी

0

रावेर- तालुक्यातील शिंदखेडा, मुंजलवाडी, भोकरी, केर्‍हाळे, अहिरवाडी, निरुळ, पाडले, खानापूर, कर्जोद आदी गावांमध्ये वादळी पावसामुळे या केळीचे नुकसान झाल्याने खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन पाहणी केलीे. जिल्हा परीषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती नंदू महाजन यांनी भेट उपस्थित होते. संबंधीत तहसीलदार व कृषी अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या. पीक विमा कंपनीच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात आली. संबंधित शेतकर्‍यांना नुकसान झालेल्या पिकाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करू, असे आश्‍वासन खडसे यांनी दिली. पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे., भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, संदीप सावळे, गोपाळ नेमाडे, महेश पाटील तसेच शेतकरीबांधव उपस्थित होते.