केशवस्मृती प्रतिष्ठान, मंगलदेव ग्रह मंदिर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माझं गाव माझं अमळनेर यांचातर्फे चेतना यात्रेचे आयोजन
अमळनेर येथे आमदार स्मिताताई वाघ यांचे आवाहन
अमळनेर ।प्रत्येकाने आपल्या घरातून नेत्र दानाचा संकल्प करावा आणि सर्वच समाजांनी नेत्रदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार स्मिता वाघ यांनी नेत्र चेतना यात्रेच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेच्या अध्यक्षीय भाषणा वेळी केले. केशवस्मृती, मंगलदेव ग्रह मंदिर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माझं गाव माझं अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामींनारायन मंदिर पासून नेत्र चेतना यात्रेला आमदार स्मिता वाघ यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला.
स्वामींनारायन मंदिर पासून नेत्र चेतना यात्रेस प्रारंभ
यात्रा सुभाष चौक, पन्नलाल चौक मार्गे, बसस्थानक होऊन जिल्हा परीषद विश्रामगृह येथे समारोप करण्यात आला. सहभागिनीं डोळ्यावर काळी पट्टी बांधून शहरातील या रस्त्यांवरून मार्गक्रमण केले. या प्रास्ताविक डिगंबर महाले यांनी केले, नेत्रतज्ञ डॉ.राहुल मुठे यांनी सांगितले की, जिवंत माणसाचे नेत्रदान होत नाही मरणोत्तर होते आणि एचआयव्हि, कॅन्सर ग्रस्त, सर्प दंशाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे नेत्र घेतले जात नाही आणि नेत्र मृत्यूनंतर 4 ते 6 तासात घेतले जातात. बाफना नेत्र पेढीचे संचालक तुषार तोतला आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात यांची उपस्थिती
व्यासपीठावर आमदार स्मिता वाघ, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय केले,लायन्स क्लबचे अध्यक्ष पंकज मुंदडा, माझं गाव माझं अमळनेर ग्रुप ऍडमिन सुनील भामरे,मंगळग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले, डॉ.नरेंद्र महाजन,प्रा अशोक पवार,बजरंग अग्रवाल, डॉ. मिलिंद नवसारीकर, डॉ. युसूफ पटेल उपस्थित होते. कार्यक्रमास छोटू जैन, प्रफुल सिंघवी, नीरज अग्रवाल, गिरीश पाटील,प्रदीप जैन,लायनेस क्लब अध्यक्षा सोनाली मुंदडा,जास्मिन भरूचा, वैशाली पहाडे, विपुला नांढा, रुपाली संघवी उपस्थित होते. शहरातून काढलेल्या या नेत्र चेतना यात्रेत शहरातील नागरीकांना मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता.