नेपाळचा भारताला इशारा

0

नवी दिल्ली । भारताचा अत्यंत छोटा शेजारी म्हणजे नेपाळ. याच नेपाळने भारताला धमकी दिल्याचा प्रकार पूढे आला आहे. नेपाळची धमकी भारतानेही गांभीर्याने घेऊन तातडीने हालचाल सुरू केली आहे. विशेत: राजधानी दिल्लीत वेगाने घडामोडी घडत आहेत. घरगुती गॅसचा (एलपीजी) पूरवठा व्यवस्थीत आणि वेळेवर करा अन्यथा आम्ही चीनची मदत घेऊ अशी धमकी नेपाळने भारताला दिली. भारताकडून नेपाळला गॅसपुरवठा करण्याबाबतचा करार 1974 मध्येच करण्यात आला आहे. त्यानुसार भारताकडून पुरवठाही सुरू आहे. मात्र, गेल्या काही काळापासून किंचीत अडचण आली. यावर दबावाचे राजकारण करत नेपाळने भारताला कोंडीत पकडले.

अर्थात नेपाळच्या धमकीला भारताने घाबरण्याचे मुळीच कारण नाही. मात्र, अशिया खंडातील राजकारणाचा विचार करता नेपाळसारखा मित्र गमावने भारताला परवाडणारे नाही. महत्त्वाचे म्हणजे नेपाळ हे भारताशेजारील राष्ट्र त्यामुले अशा राष्ट्रात चीनसारख्या राष्ट्राचा समावेश होणे भारतासाठी केव्हाही धोक्याचे. हा धोका ओळखूनच राजधानी दिल्लीतील सुत्रे वेगाने हालली. भारताने नेपाळची समजुत काढली. या सगळ्या प्रकारानंतर भारताकडून नेपाळशी करार करण्यात आला आहे. यामध्ये एलपीजीचा सुरळीत पुरवठा करण्याबरोबरच गॅस पाईपलाईन आणि साठवणुकीसाठी यंत्रणा उभारण्याचे आश्वासन नेपाळला देण्यात आले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सोमवारी नेपाळशी हा करार केला. नेपाळ हा भारताच्या सीमेलगतचा सर्वात जवळचा आणि सर्वात छोटा मित्र आहे. नेपाळची एकूण लोकसंख्याही भारताच्या एखाद्या राज्यायेवढी आहे. येथील अनेक नागरीक नोकरी आणि पर्यटनासाठी भारतात नियमीतपणे येत असतात.

काय आहे नेपाळशी करार
भारताने नेपाळशी नव्याने केलेल्या करारानुसार भारताकडून नेपाळला प्रतिवर्ष 13 लक्ष टन इंधनपुरवठा केला जाईल. 2020 पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्यात येईल. एप्रिल 2017 ते मार्च 2022 या कालावधीतील या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी. अशोक यांनी दिली आहे.