नवी दिल्ली । फुटबॉल विश्वातील एक मोठी डिल म्हणवणारी अशी घटना समोर आली आहे ती म्हणजे, जगविख्यात फुटबॉलपटू नेमार हा फ्रान्सचा क्लब झरीळी डीं ॠशीारळपचा अधिकृत खेळाडू बनला आणि त्याच्या जगभरातील चाहत्यांनी मोठा आनंद साजरा केला. नेमारच्या या निवडीमुळे अवघे फुटबॉल विश्व खळबळ उडालेली दिसते. कारण एखादा खेळाडू निवडताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा कोणत्याच फुटबॉलपटूला दिला गेला नाही. म्हणूनच ही फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी डील ठरली आहे. यादरम्यान नेमारने असे सांगितले की, आयुष्यात पूढे कोणतेच आव्हान नव्हते. केवळ याच करणासाठी मी बार्सिलोन क्लब सोडला. मला पैशाने कधीच आकर्षीत केले नाही.
नेमारच्या संपत्तीत वाढ
या डीलनंतर नेमारच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली असून, प्रत्येक आठवड्याला नेमारला किमान 8 कोटी रुपयांची कमाई होणार आहे. याचाच अर्थ असा की, नेमारच्या एका मिनिटाची किंमत कमीत कमी 8 हजार रूपये इतकी असणार आहे. इतकेच नव्हे तर, नेमारचा क्बलसोबतचा प्रत्येक सेंकद हा 130 रूपयांचे असेल. त्यामुळे हे आकडे विचारात घेता नेमारच्या या डीलने अनेक खेळाडूंना पाठिमागे टाकत संपत्तीचा उच्चांक प्रस्थापित केला आहे.