नेर गावाजवळील क्रुझरच्या अपघातात 1 ठार; 8 जखमी

0

धुळे। सुरत-नागपूर महामार्गावरील नेर गावाच्या शिवारात क्रुझरला झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. नवसारी येथून एरंडोलकडे क्रुझर एमएच19/एएक्स-6541 ने धुळ्याकडे येतांना 26 रोजी रात्री 2 वाजेपूर्वी सुरत-नागपूर महामार्गावरील नेर गावाच्या शिवारात अपघात झाला.

या अपघातात कल्पना अशोक खवळे (वय 35) रा.टाकळी-पिंपळी, जि.जळगाव, प्रमिला उमिचंद लद्दड (वय 65), अनिता भरत लद्दड (वय 32), मिवान भरत लद्दड (दीड वर्षे), रा.नवसारी, गुजरात, विकास दत्तू सूर्यवंशी (वय 30) रा.जामनेर, विकास नवृत्ती सूर्यवंशी (वय 24) मनोज रवींद्र पाटील (वय 24) रा.टाकळी, अशोक नारायण खवडे (वय 40) रा.टाकळी-पिंपळी, सागर भास्कर इंगळे (वय 25) रा.विजापूर, संभाजीनगर नवसारी हे नऊ जण जखमी झाले. त्यांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता कल्पना अशोक खवडे यांना डॉ.नितीन पवार यांनी तपासून मृत घोषित केले.