धुळे। तालुक्यातील नेर येथील एक जण घरी अत्यवस्थ आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. नेर गावातील देवानंद तुकाराम लाड (वय 50) हे राहत्या घरी अत्यवस्थ आढळून आले. तसेच त्यांची जीभ दाताखाली आल्यामुळे रक्तस्राव सुरू होता. त्यामुळे त्यांना नातलगांनी लागलीच हिरे रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले.
……………………………