नेर गावात पोलिसांकडून मोठा दारुसाठा जप्त

0

धुळे । तालुक्यातील नेर गावात एका तळघरात दारूचा साठा असल्याची खबर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली असता त्यांनी तातडीने दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने नेर गावात मोठा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

नेर येथील शुभम बिअरबार व परमिट रुम हॉटेलच्या बाजूस असलेल्या तळघरात सुमारे 7 लाख 6 हजार 407 रुपये किंमतीचा माल सापडला. जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्य एस., अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे, प्रदीप सोनवणे, पो.ना. बिपीन पाटील, पो.कॉ. मुकेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.