नेवाडे जि. प. शाळेत मोफत शालेय साहित्य वाटप

0

शिंदखेडा- क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त नेवाडे जि.प.शाळेत सेवानिवृत्त शिक्षक आर. बी. पाटील यांच्याहस्ते इंग्रजी पुस्तिका, वही पेन आदी शैक्षणिक साहित्य तसेच अंगणवाडीच्या मुलांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविक ए.झेड.पाटील यांनी केले. मूलांनी खूप अभ्यास करावा , खूप शिकावे, खूप वाचन करावे तसेच खूप खेळावेही असे आवाहन करतांनाच मोठ्यांचा मान ठेवावा, आई वडीलांना त्यांच्या कामात मदत करावी असे आर.बी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. ए. मोरे, व पालक नरेंद्र साळुंके, विकास जाधव, जितेंद्र जाधव ,लतिफ पिंजारी ,आशाबाई पाटील, हिराबाई बागुल, अलका ठाकरे, नसिम पिंजारी, ताराबाई भिल, सुरेखा कोळी, वंदना गिरासे, रत्नाबाई साळुंके, विमलबाई साळुंके व विद्यार्थी उपस्थित होते.