नेवाडे येथे सॅनिटायझर, मास्कचे वाटप

0

शिंदखेडा। तालुक्यातील नेवाडे येथे  सॅनिटायझर व मास्कचे वाटप माजी आ.रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना सोशल डिस्टन्सिंग याविषयी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील लोकांनी घराबाहेर न पडता घरात राहुन कोरोनासारख्या गंभीर आजाराला रोखणे हाच पर्याय. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोतीलाल पाटील, माजी सरपंच रमेश पवार, कांतीलाल साळूंखे, साहेबराव पवार, जयवंत साळुंके, विलास पवार, ज्ञानेश्वर पवार, लहू साळुंखे, बचत गटाचे अध्यक्ष जयश्री साळुंखे, चंद्रशेखर पाटील, गजमल पवार आदी उपस्थित होते.