नेहता येथे एकावर विळ्याने हल्ला

0

रावेर- तालुक्यातील नेहता येथे शेताचा बांध का फोडला या कारणावरून एकाच्या डोक्यावर विळ्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. 18 रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी लिलाधर शंकर सावळे (रा.नेहता, ता.रावेर) यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी प्रमोद भरत सावळे (रा.नेहता, ता.रावेर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नेहता शिवारात फिर्यादी व आरोपीच्या शेताच्या सामायीक बांधावर ही घटना घडली. दरम्यान, याबाबत जिल्हा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो रावेर पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद साळी करीत आहेत.