नवी मुंबई : पनवेल येथे राहणाऱ्या नेहा निकम हिने राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये यश संपादन केले आहे. ११ ते १३ ऑगस्ट २०१७ या कालावधीत लातूर येथे सवाते असोसिएशन राज्यस्तरीय स्पर्धा खेळवण्यात आली होती. यात नेहा निकम हिने उत्तुंग कामगिरी करत कॉम्बँक प्रकारात सुवर्ण पदक तर ऍसोट प्रकारात रौप्य पदक मिळवले. या उत्तुंग कामगिरीमुळे नेहा निकम हिची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.