लोणावळा : तुंगार्ली, लोणावळा येथील ओमकार तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ओमकार शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, शिवली या शाळेच्या नेहा संभाजी येनपुरे हिला प्रथम क्रमांकाची शिष्यवृत्तीची मानकरी ठरली. तर ऍड. पु.वा. परांजपे विद्यालय, तळेगाव शाळेची धनश्री सोनावणे द्वितीय क्रमांक व पवना विद्यामंदिर,पवनानगर शेळेची ऋतुजा कालेकर हिला तृतीत क्रमांकाची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच अपेक्षा कारंडे हिला उत्तेजनार्थ तर गायत्री त मालपोटे हिला विशेष पुरस्कार देण्यात आला याशिवाय गौरी दाते, अल्फाज शेख, आदित्य बुटाला आणि कृपणा राठोड या सर्वांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात आली.
ओमकार शिष्यवृत्तीचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत मावळ तालुक्यातील एकून 16 विद्यालयांनी सहभाग घेतला होता. गुरुकुल विद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ओमकार मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पिंगळे, गुरुकुलचे पर्यवेक्षक आसाराम आटोळे, कुमार गरड, मंडळाचे मानद अध्यक्ष जयवंत गोसावी, शिष्यवृत्ती प्रायोजक संजय उत्तेकर, अशोक साळवी, रघुनाथ मावकर, प्रकाश गवळी, सतीश गावडे, किरण येवले, विजय येवले, विजय इंगूळकर, संजय वाढ यांच्यासह कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.