नैराश्यामुळे पेट्रोलची बाटली सोबत घेऊन फिरायचा शुभम

0

जळगाव। आई-वडीलांच्या आपल्याकडील असलेल्या अपेक्षा पुर्ण होत नसून त्यातच चांगले शिक्षण घेवून देखील नोकरी मिळत नव्हती. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास केल्यानंतर त्यातही यश मिळत नसल्याने मनातून खच्चून गेलेला शुभम हा नैराश्यात गेला होता. त्यामुळे स्वत:ला संपवून टाकावे यासाठी तो सोबत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची बाटली घेवूनच फिरत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, शुभम याने आत्महत्येच्या पंधरा मिनीटापुर्वी त्याने मुंबई येथील मित्राला एसएमएस पाठविल्याचे देखील समोर आले आहे.दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या इमारतीवरून उडी मारत स्वत:ला पेटवून घेत शुभम ज्ञानेश्वर महाजन याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्याचा मोबाइल इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी दिपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्रात जावून घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर घटना पाहणार्‍या पाच ते सहा विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले.

10 जणांची केली चौकशी..
पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर व पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी तपासाला वेग देत आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांची चौकशी करून जबाब नोंदवून घेतले. या दरम्यान, शुभम याचा मुंबईचा जवळच्या मित्राची पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी त्याला शनिवारी बोलवून घेत चौकशी केली. चौकशी त्या तरूणाने पेट्रो केमिकज इंजनियरींगचे चांगले शिक्षण घेवून देखील नोकरी मिळन नव्हती. स्पर्धा परिक्षांकडे वळून देखील ते देखील आपल्याकडून होत नसल्यामुळे आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण होणार नसलयाने त्याला नैराश्य आल्याचे नेहमीच सांगायचा असे चौकशीत त्याने सांगितले. स्वत:ला संपवून ठाकेल, त्यामुळे तो पेट्रोलची बाटली जवळ बाळगत असत होता. परंतू त्याची समजूत घातल्यानंतर तो तसे काही करणार नाही, असा म्हणाल्याचेही शुभमच्या मित्राने सांगितले. तर 25 एप्रिला शेवटचा मेसेज केल्याचेही त्याने सांगितले.

शुभमला शिक्षक बनण्याची आवड
शुभम याचे पेट्रो केमिकल्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण झाले. मात्र कंपनी किंवा राज्यसेवेमध्ये यश मिळवून काम करण्याची त्याची ईच्छा नव्हती. गणितावर त्याची चांगली पकड होती. गणिताचे शिक्षक होवून सेवा देण्याची त्याची ईच्छा होती असे अनेक वेळा त्याने शुभमने मुंबईच्या मित्राकडे बोलुन दाखविले होते. यासाठी शुभमने खासगी क्लासेस टाकण्याचा विचारही केल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच यानंतर पोलिस आता कुटूंबियांसह नातेवाईकांचे देखील जबाब नोंदविणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी दिली.