मुंबई। भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा राहिला आहे.त्याने आपल्या नेतृत्वा क्रिकेटमधील सर्वच महत्वाचे चषक जिकले आहे. आयपीएलमध्ये तो आरपीएस मध्ये खेळत आहे.मात्र तो आपला नैसर्गिक खेळ खेळण्याची गरज आहे.त्याला आशा आहे की, भारताचा माजी कर्णधार मोठी धावसंख्या उभारावी व आपल्या जुन्या लयमध्ये यावे ज्याकरिता धोनी ओळखला जातो. ब्रेट ली म्हणाला की, माझ्या विचारानुसार एमएस धोनीला आपल्या नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी येथे बसुन मला असे म्हणायाचे नाही आहे की, त्याने कसे खेळावे, कारण तो एक शानदार फलंदाज असून तो चांगला कर्णधार ही आहे.माझा विश्वास आहे की, ते आपल्या नैसर्गिक खेळ खेळून आपल्या लयमध्ये परत येईल. गेल्यावेळी आरपीएसचे नेतृत्व करणारा धोनी यावर्षी कर्णधाराच्या जबाबदारीतून मुक्त झाला असून त्याच्या जागेवर स्टिव स्मिथ कर्णधार बनविले आहे.2017 च्या आयपीएलमध्ये धोनीने तीन सामने खेळले आहे.ज्यामध्ये नाबाद 12,5 आणि 11 धावा काढल्या आहे.
यष्टीरक्षक फलंदाज यावर्षी अंतरराष्ट्रीय क्रिकेट जास्त खेळला नाही आहे.त्याने शेवटचा बैगळुरू मध्ये इंग्लंड विरूध्द तिसरा टी-20 अंतरराष्ट्रीय सामना खेळला त्यामध्ये त्याने 56 धावा काढल्या आहे.धोनीचे या आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन राहिले नाही आहे. स्टीव स्मिथ व अजिंक्य राहणे यांनी चांगली फलंदाजी करून पुणे संघाला विजय मिळवून दिला आहे.पुढे ब्रेट ली म्हणाला की, भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज याच्यात स्पर्धा वाढली आहे.वाढत्या स्पर्धामुळे धोनीला यापेक्षा अधिक ट्रेनिंग मिळणार आहे.ऋषभ पंत आणि संजू सैमसन यांनी आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र ऑस्ट्रोलियाच्या खेळाडूचे मानणे आहे की, धोनी प्रोत्साहन देणारा आहे.त्यामुळे त्याच्या भारतीय संघातील स्थानाला धोका नाही.संघात प्रतिस्पर्धी वाढल्याने माहीला चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळेल.यावेळी आरपीएलसंघ सातव्या स्थानावर आहे. धोनी व त्यांच्या संघाने चांगली कामगिरी करून आपल्या संघाचे स्थान अंकतालिकेतील स्थान सुधारावे.