नोंदणीकृत पदवीधरांची यादी उमवित संमत

0

जळगाव । उमवि प्राधिकरणांच्या निवडणूकां संदर्भातील सविस्तर माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या www.nmu.ac. in या संकेतस्थळासह प्रशासकीय इमारतीतील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणार उमवि प्राधिकरणांच्या निवडणूकां संदर्भातील सविस्तर माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळासह प्रशासकीय इमारतीतील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान कुलगुरुंनी 2015 मधील नोंदणीकृत पदवीधरांचे अर्ज महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, 2016 चे कलम 131 (4) नुसार नोंदणीकृत पदवीधर म्हणून मान्य केले आहेत.

विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीची पूर्वतयारी
नवीन प्राधिकरणे गठित करण्यासाठी विद्यापीठाच्या निवडणूक विभागाकडून निवडणूक पूर्वतयारी सुरु आहे. नवीन प्राधिकरणाची मुदत 1 सप्टेंबर, 2017 पासून पुढील पाच वर्षांकरीता असणार आहे. नावनोंदणी सूचना, निवडणूकीसंदर्भातील अधिसूचना इतर विषयांची आवश्यक ती माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द होईल. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावरील रुम नं.106 समोरच्या नोटीसबोर्डासह दुसर्‍या मजल्यावरील रुम नं. 407 च्या बाजूला नोटीसबोर्डावर निवडणूक प्रक्रियेशी निगडित सूचना लावण्यात येतील. इच्छुकांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या www.nmu.ac. in या संकेतस्थळावरील www.nmu.ac.in /election या पोर्टलवर किंवा वर नमूद केल्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द होणार्‍या सूचनांची माहिती घ्यावी. निवडणूक सूचना व अधिसूचना यासंदर्भातील कोणताही पत्रव्यवहार विद्यापीठाकडून केला जाणार नाही. याकरिता संकेतस्थळ अवलोकन करण्याची जबाबदारी संबंधितांची असेल. याबाबत काही अडचणी असल्यास निवडणूक विभागास election2017nmu.ac.in या ई-मेलवर अथवा 0257-2257348 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.