नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक

0
निगडी : ऑनलाइन संकेतस्थळावरून नोकरी संदर्भात मेल आला. त्यात दिलेल्या अटींची तरुणाने पूर्तता केली. त्यातूनच वारंवार पैशांची मागणी झाली. तरुणाने वारंवार ही पैशांची मागणी देखील पूर्ण केली. तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपये घेतले. लाखो रुपये घेऊन देखील तरुणाला नोकरी दिली नाही. हा प्रकार निगडी प्राधिकरण येथे 12 सप्टेंबर 2017 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत घडला. जौजफ शेख (वय 27, रा. निगडी) या तरुणाने फिर्याद दिली. त्यानुसार अनुप सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याची विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जौजफ या तरुणाला 12 सप्टेंबर 2017 रोजी मॉन्स्टर जॉब्ज डॉट कॉम या ऑनलाइन जॉब पोर्टलवरून नोकरीसंदर्भात मेल आला. नोकरीसाठी आरोपीने त्याच्या बँक खात्यावर पैसे भरण्याची मागणी केली. जौजफने देखील वारंवार पैसे आरोपीच्या बँक खात्यावर भरले. आरोपीने जौजफ कडून तब्बल 5 लाख 61 हजार 308 रुपये घेतले. लाखो रुपये घेऊन देखील जौजफ ला कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.