नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

0

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील शेलार चौक इंदिरा नगर मध्ये राहणारा साईनाथ कसबे 23 या तरुणाला काही दिवसांपुर्वी एक फोन आला त्याला डोंबिवली पुर्वेकडील मेघर्स इंटरप्रायझेस मध्ये बोलवले तसेच बँकेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे घेतले .

10 दिवस उलटूनही नोकरी बाबत काहीच उडवा उडवीची उत्तरे दिल्याने कसबे यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मेघर्स इंटरप्रायझेसचे मालक रवींद्र वामन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.