नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, पत्नीसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

0

गुरुग्राम : नोकरीचे आमिष दाखवून तसेच बँकेत नोकरी केल्याचे खोटे प्रमाणपत्र बनवून बँक आणि लोकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस झाली आहे. या भामट्यांविरोधात गुरुग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित आणि त्याची पत्नी कोमल असे आरोपींची नावे आहेत.

रोहितचे दिल्ली येथे कन्सलटन्सी कार्यालय आहे. तसेच त्याची पत्नी एचडीएफसी बँकची मॅनेजर होती. बँकमध्ये कुठल्याही पदासाठी जागा निघल्यास कोमल त्याला माहिती देत होती. यानंतर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या लोकांशी संपर्क करुन बँकेत काम केल्याचे खोटे अनुभव प्रमाणपत्र बनवून द्यायचा. यासाठी तो त्यांच्याकडून जवळपास २ ते ३ लाख रुपये घेत होता. एचडीएफसी बँकेत खोटे अनुभव पत्र देऊन बँकेसह लोकांची फसवणूक केल्याचे तब्बल ६५ प्रकरण समोर आले आहे. याविरोधात बँक व्यवस्थापक यांनी तक्रारीनुसार पती-पत्नी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीला लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले आहे.