नोकियाचा अनब्रेकेबल 3310 पुन्हा येणार

0

मुंबई । नोकियाच सर्वात प्रसिद्ध 3310 हा अनब्रेकेबल तसेच अनबिटेबल हँडसेट लवकरच नव्या रुपात बाजारात येत आहे.

नव्याने मोबाईल बाजारात दाखल झाले तेव्हा नोकियाच्या मोबाईलची चलती होती. त्यातल्या त्यात त्याकाळचा नोकियाचा 3310 हा हँडसेट खास होता. कितीही वापरला तरी दोन दिवस त्याची बॅटरी चालत असे. त्यातील स्नेक 2 हा गेम तर सर्वांच्याच आवडीचा होता. या मोबाईलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा मोबाईल अतिशय मजबूत होता. कसाही वापरला, अनेकदा पडला तरी हँडसेटला काहीच होत नसे. त्यामुळे त्याकाळी अनेकांच्या खिशात हा मोबाईल असायचाच. मात्र, पुढे अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आणि पुढील काही काळातच साध्या मोबाईलची जागा स्मार्ट फोनने घेतली. तरीही ज्यांनी नोकियाचा जुना 3310 मोबाईल वापरला आहे, त्यांच्या मनातील त्या हँडसेटचे प्रेम अजूनही कायम आहे.

त्यामुळेच नोकियाचा ब्रॅण्ड वापरण्याचा हक्क मिळालेली एचएमडी ग्लोबल ही फिनलॅण्ड कंपनी आता नव्याने नोकियाचा जुना हँडसेट लॉन्च करत आहे. 3310चे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.