नोटप्रेसमध्ये नोकरीचे आमीष

0

दाखवून युवकाची 1 लाखात फसवणूक

धुळे । नाशिक येथील नोटप्रेसमध्ये नोकरीस लावून देतो, असे सांगून धुळे तालुक्यातील युवकाला 1 लाखात गंडविल्याची घटना घडली आहे. हे पैसे शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहीरे या गावी देण्यात आल्याने तक्रारही दोंडाईचा पोलिसात नोंदविली गेली आहे. याबाबत धुळे तालुक्यातील नंदाणे येथे राहाणार्‍या योगेश ज्ञानेश्‍वर खैरनार याने तक्रार केली असून नांदेड येथील विजय आसाराम गांगुर्डे, नाशिक येथील शांताराम बागूल, किरण शांताराम बागूल व रविंद्र शांताराम बागूल अशा चौघांनी योगेशला नाशिकच्या नोटप्रेसमध्ये कामाला लावून देतो, असे सांगून त्याच्याजवळून 1 लाख रूपये घेतले. मात्र एक लाखांची ही रक्कम शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहीरे या गावी असलेल्या योगेशच्या नातलगाच्या घरी या चौघांना देण्यात आली होती. हा व्यवहार 15 जानेवारी 2017 रोजी दुपारी 1 वाजता झाला होता. मात्र गेल्या चार महिन्यात योगेशला नोकरी न मिळाल्याने त्याने पैसे परत मागितले असता रविंद्र शांताराम बागूल याने 1 लाखांचा चेक परत दिला. परंतु, तो चेक बँकेत वटलाच नाही. त्यामुळे योगेश खैरनारने पोलिसात तक्रार केली. योगेशच्या तक्रारीवरून नांदेड येथील विजय गांगुर्डेसह नाशिकच्या बागूल पिता-पुत्रावर भादंवि 420, 34 अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.