नोटबंदीनंतर बँकांमध्ये सर्वाधिक जमा केल्या नकली नोटा

0

नवी दिल्ली । देशभरात 8 नोव्हेंबर 2016 रोजीच्या नोटबंदीनंतर भारतातील बँकांमध्ये सर्वाधिक खोट्या नोटा जमा झाल्याचे निर्दशनात आले आहे. या रकमेसंदर्भातील पहिल्याच अहवालात ही बाब समोर आली आहे. याशिवाय 2016-17 च्या आर्थिक वर्षात संशयास्पद 480 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा अहवाल फायनान्शियन इन्टेलिजन्स युनिटच्या (एफ आययू) ने जारी केला आहे. ही संस्था देशात होणार्‍या संशयित आर्थिक व्यवहारावर नजर ठेवते.

या अहवालानुसार, देशातील सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये सामूहिक स्वरूपात 400 टक्क्यांपेक्षा जास्त संशयित व्यवहार झाले आहेत. तसेच 2016-17 या वर्षामध्ये 4.73 लाखांपेक्षा जास्त व्यवहार संशयास्पद झाले असल्याचे देखील एफआययूने अहवालात म्हटले आहे. 2015-16 च्या तुलनेत यामध्ये 4 पटीने वाढ झाली आहे. एसटीआरमध्ये सर्वाधिक प्रकरणे बँकेच्या श्रेणीत समोर आले आहेत. आर्थिक संस्थांच्याबाबतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामध्ये 270 टक्के इतकी वाढ आहे. 2015-16 मध्ये 1.05 लाख एसटीआर बनवण्यात आल्या होत्या. यातील 61,361 एसटीआर बँकांच्यावतीने एफआययूला पाठवल्या होत्या. बनावट नोटांसोबतच बँकेमधून होणार्‍या संशयास्पद व्यवहारांची संख्यादेखील वाढली आहे. या आर्थिक वर्षात नोटाबंदीनंतर 7.33 लाख बोगस नोटा आढळल्या’, असे एफआययूच्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार नोटाबंदीनंतर झाले आहेत.