नोटबंदी निरव मोदीला आधिच माहिती होती

0

चेन्नई । नोटबंदीची कल्पना निरव मोदीला आधिच होती. 8 नोव्हेंबर 2016 या नोटाबंदी जाहीर झालेल्या दिवसा त्याने आधीच पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेतून 90 कोटी रुपयांच्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार माजिद मेमन यांनी केला आहे.

यावरुन नोटाबंदीची माहिती आधीच काही लोकांना माहित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मेमन यांनी एका अहवालाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आरोप केलेल्या मुद्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा नीरव मोदी भारत सोडत होता त्याचवेळी एक असा अहवालही आला होता की, नोटाबंदीच्या घोषणेच्या काही काळ आधी पीएनबीच्या एका शाखेत 90 कोटी रुपयांची रोकड बदलून घेण्यासाठी आणण्यात आली होती.