मुंबई : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहलला लाँच करण्याच्या तयारीत आहे. सलमान खानने स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात प्रनूतनसोबतच नवोदीत अभिनेता जहीर इकबालही दिसत आहे.
या चित्रपटाचे ‘नोटबुक’ असे नाव आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.