• Tuesday, May 13, 2025
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

Janshakti Newspaper Janshakti Newspaper - Latest News, Marathi Newspaper, Marathi Latest News

  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
Janshakti Newspaper
  • Home
  • Uncategorized
  • नोटाबंदीच्या काळात बँकेत 2 लाख जमा करणारे आयकर विभागाच्या रडारवर

नोटाबंदीच्या काळात बँकेत 2 लाख जमा करणारे आयकर विभागाच्या रडारवर

Uncategorized
On Feb 19, 2017
0
Share

नवी दिल्ली । नोटाबंदीच्या काळात आपल्या बँक खात्यामध्ये दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणार्‍यांकडे आयकर विभाग चौकशी करण्याची शक्यता असून उत्पन्न स्त्रोताची माहिती मागू शकतात. याअगोदर केंद्र सरकारने नोटाबंदीच्या वेळी बँकेत अडीच लाखापर्यंत पैसे जमा करणार्‍यांची चौकशी केली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र बँक खात्यांची तपासणी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नोटाबंदीदरम्यान 50 दिवसांत तब्बल एक कोटी बँक खात्यांमध्ये दोन लाख आणि त्याहून जास्त रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम जवळजवळ 10 लाख कोटी इतकी आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आयकर विभाग आता पैसे जमा करणा-यांना संदेश पाठवून या पैशांचा हिशेब मागण्याची तयारी करत आहे.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला खात्यांचा वापर

हे देखील वाचा

दुचाकीची मोटारसायकलची समोरा समोर धडक दोन ठार

Nov 2, 2023

वरणगावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा*

Oct 22, 2023

आयकर विभागाच्या सुत्रांनुसार, सरकारने केलेल्या घोषणनेंतर लोकांनी आपल्या बँक खात्यांमध्ये दोन लाख आणि त्याहून जास्त रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. म्हणजेच त्यांनी अडीच लाखांहून कमी रक्कम बँकेत जमा केली, जेणेकरुन आयकर विभागाच्या रडारवर ते येणार नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम आणि आयकर परताव्यात दिल्या गेलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. जर काही संशयास्पद आढळले तर लगेच मेसेज आणि ई-मेल पाठवून संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले जाईल. काळा पैसा सफेद करण्यासाठी या बँक खात्यांचा वापर झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागाने या खात्यांची दोन वर्षांची माहिती मागितली आहे, ज्यामधून नक्की किती व्यवहार यांनी केला आहे याची माहिती मिळेल. दुसरीकडे नोटाबंदीच्या काळात म्हणजे 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या काळात बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमांचा भरणा करणार्‍यांपैकी ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर रिटनर्शी मेळ खात नाहीत असे 18 लाख करदाते प्राप्तिकर विभागाने शोधून काढले असून त्यापैकी 9 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या नजरेत आले आहे.

नोटबंदी काळात अनेक खाती उघडली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. यादरम्यान अनेक नवी खाती बँकमध्ये उघडण्यात आली होती. नोटाबंदीनंतर 18 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या 18 लाख खातेदारांचे टॅक्स प्रोफाईल आणि त्यांनी जमा केलेल्या रकमेत अंतर असल्यामुळे या खातेदारांना एसएमएस आणि ई-मेल पाठवण्यात आले आहेत, 18 लाखापैकी 9 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या संशयाच्या भोवर्‍यात आली आहेत. 9 लाख खात्याची चौकशी होणार असून दोषी आढळल्यास 31 मार्चनंतर खातेदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Bank account for two milliondeposit moneyFor thoseIncome TaxNew Delhi
0
Share

Prev Post

गुजरात महाराष्ट्रातील क्राफ्ट पेपर मिल होणार बंद

Next Post

महापालिका निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज

You might also like More from author
Uncategorized

दुचाकीची मोटारसायकलची समोरा समोर धडक दोन ठार

Uncategorized

वरणगावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा*

Uncategorized

हायकोर्टाचा सरकारला दणका, तब्बल 112 न्यायाधीशांच्या नियुक्त्या रद्द;*…

Uncategorized

स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत…

Prev Next

ताज्या बातम्या

डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संवेदनशीलेतेला सलाम…काय अफाट…

Feb 23, 2024

धरणगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास

Feb 23, 2024

‘कोहिनूर’ गमावला…! माजी मुख्यमंत्री मनोहर…

Feb 23, 2024

आर्ट मार्ट राष्ट्रीय कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांची…

Feb 22, 2024

केसीईच्या शिक्षण व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे…

Feb 21, 2024

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत आयएमआरच्या…

Feb 21, 2024

ए. टी.झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला निरोप

Feb 21, 2024

बाल शिवाजीच्या रूपातील रोनीत बाविस्करचे सर्वत्र कौतुक

Feb 20, 2024
Loading ... Load More Posts No More Posts
© 2025 - Janshakti Newspaper. All Rights Reserved.
Website Contact: Yateen Dhake. 9049554000
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर