न्यूयॉर्क-सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन डेल पोत्रोला पराभूत केले आणि यंदाच्या हंगामातील सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा ही २०१८ च्या हंगामातील अंतिम ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून जोकोव्हीचने हंगामाचा शेवट चांगला केला आहे.
जोकोव्हीचने उपांत्य फेरीत निशीकोरीला सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर जुआन डेल पोत्रोने नदालला कडवी झुंज दिली होती. स्टार खेळाडू राफेल नदाल याला उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. जोकोव्हीचने यंदाचे विम्बल्डन विजेतेपदही आपल्या नावे केले होते. त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला धूळ चारली होती.