नोव्हेंबरअखेर पालिकेचे स्थलांतर

0

भुसावळ: पालिकेची ब्रिटीशकालीन ईमारत जीर्ण झाल्याने तत्काळ ईमारत स्थलांतर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सूचना केल्या होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून नोव्हेंबर अखेरीस पालिकेचे स्थलांतर गोपाळ नगरातील पालिकेच्या संकुलात तसेच सांस्कृतिक भवनात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी दिली.

जीर्ण इमारतीतून पालिकेचे स्थलांतर आता गोपाळ नगरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सह सांस्कृतिकभवनात होणार आहे. गोपाळ नगरातील पालिकेच्या रीकाम्या संकुलात 37 गाळ्यांची डागडूजी प्रशासनाने केली आहे शिवाय स्वच्छतागृहाला दरवाजेदेखील बसवण्याचे काम करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सांस्कृतिक भवनात पालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे दालन तसेच मिटींग हॉल, लेखापाल, आस्थापना मुख्य कार्यालय, बांधकाम विभागाचे कामकाज चालणार आहे तर गोपाळ नगरातील संकुलातील 37 गाळ्यांमध्ये शहरी नागरी उपजीविका अभियान, संगणक, रेकॉर्ड रूम, इलेक्ट्रीक, आरोग्य आदी विभागांचे कामकाज चालणार आहे.