नौदलात नोकरीचे आमिष; पावणेपाच लाखास गंडा

0

वाकड : नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणाची पावणेपाच लाखांची फसणूक केली. या प्रकरणी मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुजय संजय घनवट (वय 21, रा. गारमळा कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार निलेश अण्णा थोरात, नितीन अण्णा थोरात, संगीत अण्णा थोरात (सर्व रा. मोरगाव, बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घनवट यांना नौदलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी 4 लाख 74 हजार 554 रुपये घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याने घनवट यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.