नौदलाने घेतली ब्राम्होसची यशस्वी चाचणी

0

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने बनविण्यात आलेल्या ब्राम्होस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी केली आहे. अंदमान आणि निकोबार बेट समूहाजवळ समुद्रात ही चाचणी घेण्यात आली. नौदलाच्या आयएनएस तेग या युद्धवाहू नौकेवरून हे परीक्षण करण्यात आले.

ब्राम्होसची ही सलग चौथी यशस्वी चाचणी आहे. आयएनएस तेगवरून मोबाईल ऑटोनॉमस लाँचरच्या माध्यातून ही चाचणी करण्यात आली. यामध्ये हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता पाहण्यात आली. या अगोदरदेखील ब्राम्होसच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये हवेत आणि जमिनीवर मारा करण्याची क्षेपणास्त्राची क्षमता पाहण्यात आली होती. आतापर्यंतच्या सर्व चाचण्यांमध्ये ब्राम्होस यशस्वी झाले आहे. ब्राम्होसच्या या यशस्वी चाचणीमुळे चीनच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. ब्राम्होस हे अमेरिकेच्या टॉमक्रूज क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक वेगवान आहे. तसेच हे शस्त्र भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.