जळगाव । महापालिका मालकीच्या मुदत संपलेले गाळे ताब्यात घेण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील गाळेधारकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. रामुळे पालिका प्रासनाने गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले असून त्याची माहीती शासनाला देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महापालिका मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने 14 जुलै 2017 रोजी दोन महिन्यांत गाळे ताब्यात घेऊन महापालिका प्रशासनाने पुढील प्रक्रिया करावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर द्विपीठासमोर कामकाज झाले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 4 डिसेंबर रोजी गाळेधारकांची ही याचिका फेटाळली आहे.
गाळ्रांची माहिती, कागदपत्रे तरार
गाळेधारकांची याचिका फेटाळल्याने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याचा महापालिका प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच स्थगिती नसल्याने हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार ही कारवाई पालिकेला करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. संबधित गाळ्यांची माहीती व कागदपत्रे तयार ठेवली आहेत. नुकतेच सर्वोच्च न्रारालराने याचिका फेटाळल्याबाबतचे आदेश देखिल पालिका प्रशासनला प्राप्त झाले आहेत. या आदेशांबाबतची माहीती पालिका प्रशासनाकडून शासनाला दिली जाणार आहे. त्यानतंर गाळे ताब्यात घेण्याच्या कारवाईस सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.