न्यायालयातील केसेस मागे घेण्याच्या कारणातून आडगावात हाणामारी : तिघे जखमी

0

यावल- तालुक्यातील आडगाव येथे न्यायालयातील जुन्या केसेस मागे घेण्याच्या कारणावरून सहा जणांनी तिघांना लोखंडी पाईप व विळ्याने हल्ला चढवत जखमी केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश यशवंंत पाटील (रा.आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील संशयित योगेश सूर्यभान पाटील, रवींद्र पंढरी पाटील, दिनेश पंढरी पाटील, बाळू रामदास पाटील, उज्वला सूर्यभान पाटील व संगीता रवींद्र पाटील यांनी न्यायालयात सुरू असलेल्या केसेस मागे घ्याव्यात म्हणून सुरेश पाटील यांच्यासोबत वाद घातला. हा वाद वाढून सहा आरोपींनी लोखंडी पाईप, विळ्याद्वारे हल्ला चढवला. त्यात फिर्यादी सुरेशसह रवींद्र यशवंत पाटील, नंदू यशवंत पाटील असे तिघे जखमी झाले. तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करत आहे.