न्याय न मिळाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन

0

जळगाव : रावेर तालुक्यातील मौजे विवरे ब्रु. गावातील शासन मालकीचा गट नं. 325 अ-2 या जागेवर गेल्या 30 वर्षांपासून दलित आदिवासी, भटके विमुक्त जातीचे 70 कुटूंब अतिक्रमण करून राहत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या झोपड्या पाडण्यात येत आहेत. परंतु, त्यांच्याकडे गोरगरीबांच्या झोपड्या पाडल्यानंतर त्यांच्याकडे दुसरी जागा नसल्याने ते पुन्हा तेथेच राहत आहेत. नेहमी झोपड्या पाडण्यात येत असल्याने शासनाकडे या कुटूंबियांनी 2006मध्ये अर्ज करून रहिवासाकरीता गट नं. 325/2 या जागेची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही ही जागा न मिळाल्याने जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यचा इशारा रिपाई (आठवले) गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणादरम्यान दिला आहे.

वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष
60 कुटूंबियांनी जागेची मागणी केली होती. परंतु सन 2015 मध्ये 60 पैकी 44 लोकांच्या मोजणीचे पत्र रावेर भुमी अभिलेख कार्यलयाकडू प्राप्त झाले होते. उर्वरीत 16 व्यक्तींच्या प्रस्तावाबाबत वारंवार विचारणा करून देखील तहसिलदारांनी याकडे दुर्लक्ष केले. गट नं. 325 अ-2ची मोजणी करण्यात आली. यातही 44 पैकी केवळ 13 लोकांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. याअन्यायाविरोधात झोपडीधारक व रिपई आठवले गटाने अमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणात सहभागी नागरिक
उपोषणकर्ते हसिना अरमान तडवी, द्वारकाबाई गाढे, साबेरा रमा तडवी, ममताबाई नादर तडवी, रजियाबाई शरीफ तडवी, येनाबाई गाढे, लाडकाबाई गाढे, सिंधुबाई गाढे, विमलबाई गाढे, सलिमा इब्राहिम तडवी, जिजाबाई गाढे, हसिनाबाई तडवी, विमलबाई यादव, शेख सुपडू शेख कालू, साहेबराव भराडी, उसमान ईस्माईल तडवी, बाळू संन्यास, रेहमान रमाजी तडवी, मुन्नालाल सिसोदिया, मातमा हैदर तडवी, उनसयाबाई तडवी, नंदाबाई बाविस्कर हे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

रिपई आठवले गटाचा पाठिंबा
ग्रामस्थांसोबत रिपई(आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, अनिल अडकमोल, नितीन अस्मार, रमाताई ढिवरे, मिलींद सोनवणे, भरत मोरे, भिमराव सोनवणे, सागर सपकाळे, सुरेखा बेडसे, अनिल आराक, अशोक पारधे, यशवंत घोडेस्वार, वासुदेव कुकरेजा, नरेंद्र मोरे, अविनाश पारधे, किरण कोळी, इश्‍वर चंद्रे. महेंद्र सपकाळे, माधव निकम आदींनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे.