न्या. लोयाप्रकरणी सोमवारी सुनावणी

0

नवी दिल्ली : गुजरातमधील सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रीजगोपाल लोया यांचा डिसेंबर 2014 मध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयांत सोमवारी सुनावणी होणार आहे. वेळेअभावी शुक्रवारचा युक्तीवाद पूर्ण होऊ न शकल्याने सुनावणीही अपूर्ण राहिली आहे.

दाखल याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. 2014 मध्ये न्या. लोया हे सोहराबुद्दीन शेख चकमकप्रकरणाची सुनावणी करीत होते. याची सुनावणी सुरु असतानाच त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुख्य आरोपी होते. न्या. लोया यांच्या मृत्यूनंतर दुसर्‍या न्यायमूर्तींसमोर झालेल्या सुनावणीत अमित शहा यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्या. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.