न्यू सिटी प्राईडमध्ये बाल दिवस साजरा

0

रहाटणी : येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रो पोलीसांच्या चेअरमन रितू गुप्ता यांच्या हस्ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नंदिनी गोखले, अर्चना जोशी बिना डाटा, पूर्णिमा जैन उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यासाठी गाणी व कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. नंतर विद्यार्थ्यासाठी खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका सुप्रिया कोम्पेल्ली यांनी केले. सुवर्णा पाटील यांनी आभार मानले.