न्हावरावासीयांचे रास्ता रोको आंदोलन

0

शिक्रापूर । संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दौंड तालुक्याच्या कानगावमधील शेतकरी 2 नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. या संपाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी, झोपेचे सोंग घेतलेल्या नाटकी सरकारचे डोळे उघडण्यासाठी व शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सोमवारी न्हावरा ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच संपूर्ण गाव बंद ठेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष व माजी उपसरपंच सागरराजे निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. वसंतकाका कोरेकर, घोडगंगा कारखान्याचे संचालक गोविंद काका निंबाळकर, सुरेश कोरेकर, शिरुर राष्ट्रवादी सा. न्याय विभागाचे अध्यक्ष महादेवअण्णा जाधव, बापू काळे, बापू कुटे आदी मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब कोरेकर, माजी उपसरपंच संभाजी बिडगर, पै. कैलाशजी पवार, हिरामण मासाळ, बबलू थिटे आदी मान्यवरांसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.