फैजपूर : न्हावीतील विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात पतीसह सासू व सासर्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दागिण्यांसह पैसे न आणल्याने छळ
यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेर असलेल्या सीमरन रहिम पिंजारी (26) यांचा विवाह मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथील रहिम मोहम्मद पिंजारी यांच्याशी रीतीरीवाजानुसार 2020 मध्ये विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती रहिम पिंजारी याने विवाहितेला माहेरहून सोन्याचे दागिने व पैश्यांची मागणी केली. पैसे आणले नाही तर तुला नांदविणार नाही, असे सांगून धमकी दिली तसेच सासू आणि सासरे यांनीदेखील पैश्यांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरूवार, 21 एप्रिल रोजी विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रहिम मोहम्मद पिंजारी, सासू तमीजा मोहम्मद पिंजारी आणि सासरे मोहम्मद पिंजारी (सर्व रा.बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र महाजन करीत आहेत.