न्हावीत तरुणावर विळ्याने हल्ला

फैजपूर : यावल तालुक्यातील न्हावी येथील धनगर वाडा भागात येथे मुलीसोबत बोलण्याच्या कारणावरून तरूणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

एकाविरोधात गुन्हा दाखल
जितेंद्र अनिल तळेले (23, बोरखेडा, ता.यावल) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शेती करतो. रविवार, 12 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जितेंद्र तळेले हा न्हावी येथील धनगर वाड्यात उभा असतांना संशयीत मयूर उर्फ डिगंबर जनार्दन तळेले (न्हावी, ता.यावल) याने जवळ येवून मुलीशी का बोलतो ? असा जाब विचारून शिवीगाळ केली आणि हातातील लोखंडी विळा जितेंद्रच्या मानेवर टाकल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या जितेंद्रला तातडीने यावल ग्रामीण
रूग्णालयात हलविण्यात आले. याबात जितेंद्र तळेले यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी मयूर उर्फ डिंगंबर जनार्दन तळेले (न्हावी, ता.यावल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहे.