पुणे:विश्वातील सर्व संस्कृतीमधें भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन तसेच सर्वश्रेष्ठ आणि अद्वितीय आहे .आपल्या संस्कृतीमध्ये वेद, पुराण, उपनिषद इत्यादी महत्तम ग्रंथामध्ये या विश्वाची व मानवाची निर्मिती कशी झाली हे सविस्तर सांगितलेले आहे. तसेच त्याच्यामध्ये उत्पत्तीसाठी ब्रह्मदेव , पालनपोषणकरीता विष्णुदेव व संहारासाठी महादेव यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे .
प्रकृती , महत्तत्त्व , अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ प्रकृतीसह दहा इंद्रिये , मन आणि पंचमहाभूते असे सोळा विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांड आहे. त्यात सर्वशक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्तत्त्व,अहंकार,पंचमहाभूते, पंचतन्मात्रा , मन, पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये अशा तेवीस तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले, या सर्वांचा अभ्यास आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.जितेंद्र होले यांनी केले.
प्रा.डॉ.जितेंद्र होले राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात पुणे येथे कार्यरत आहेत.पंचमहाभूतांची तन्मात्रा, विकृती आणि कार्यरूप लक्षणे पंचमहाभूते, तन्मात्रा, विकृती, कार्यरूप लक्षणे, आकाश
शब्द , उल्कापात ,वीज पडणे , आकाशातून येणारे गोळे आणि आपत्ती
शब्दांचे ज्ञान श्रोतेंद्रिय (कांन) करून देते, शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देते, न दिसणाऱ्याही बोलणाऱ्याचे स्थानाचे ज्ञान करून देणे. सर्व वस्तुंना पोकळी निर्माण करून देणे, सर्वांच्या आत बाहेर राहणे. प्राण , इंद्रिये , मन यांचा आश्रय होणे
वायू
स्पर्श
बोचरा आणि असह्य वारा, वावटळी धुळीचे ध्वज सेना
स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते.कोमलता ,शीतलता , उष्णता आणि वायूचे सूक्ष्म रूप ,वृक्षांच्या फांद्या हलवणे , तृण इत्यादींना एकत्रित करणे सगळीकडे पोहचणे ,गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे .
जल
रस
प्रलय, कमी जास्त जलसंचय , पाण्याच्या समस्या
पाणी आणि रसाला ग्रहण करणारी जीभ उत्पन्न झाली. एकच रस भौतिक पदार्थाशी संयोग झाल्याने तुरट,गोड, तिखट , कडू ,खारट, आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो . भिजवणे माती इत्यादी गोळा करणे, जिवंत ठेवणे, तहान भागविणे, पदार्थाना मृदू बनविणे, उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यावरही तेथे पुन्हा पुन्हा प्रगट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत .
पृथ्वी
गंध
भूकंप, जमिनीच्या समस्या
वास ग्रहण करणारे नाक प्रगट झाले. परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी आदिक पणामुळे तो वास मिश्रगंध , दुर्गंध , सुगंध , मृदू ,तीव्र , आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो
अग्नी
रूप
अग्नितांडव ,उष्णता
तेज आणि रुपाला प्रगट करणाऱ्या नेत्रेंद्रियांचा (डोळा ) उगम , वस्तूचे आकाराचे ज्ञान करून देणे , पदार्थाच्या अंगरूपाने असणे , पदार्थांचा जसा आकार, प्रकार,आणि परिमाण इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखविणे आणि तेजोरूप असणे , चमकणे , पक्व करणे , थंडी दूर करणे सुकविणे , तहान भूख उत्पन्न करून त्याच्या निवृत्तीसाठी भोजन करणे , पाणी पिणे .
आपल्या या ग्रंथांमध्ये फक्त आध्यात्मिककथांचाच उल्लेख नसून शाश्रीयदृष्ट्या वैज्ञानिक विचार मांडण्यात आले आहे. आज आपल्याला आजच्या प्रगत विज्ञान आणि तांत्रिकदृष्टीने तसेच अँप्लिकेशन बेस अभ्यास करण्याची गरज आहे. मला असे वाटते आज जर हे पंचमहाभूतेंचा अभ्यास जर शालेय ,महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी तर म्हणेल प्रत्येक महाभुतांची सायन्स अँड इंजिनीरिंग ची शाखा म्हणून व्यावसायिक शिक्षणामध्ये याचा समावेश केला गेला पाहिजे.
वरीलप्रमाणे जर विध्यार्थ्यांचा त्या पंचमहाभूतांचा बेसिक तसेच रिसर्च अँड इंनोव्हेटीव्ह पद्धतीने सखोल अभ्यास झाला तरच आज किंवा भविष्यात येणाऱ्या आपत्ती , संकटांवर मात करण्यास समर्थ होईल व आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणार खर्च ,वेळ, जीवितहानी इत्यादी पासून बचाव करता येईल .