जळगाव । जिल्ह्यात 18 ते 20 एप्रिल दरम्यान पंचायत राज समिती येत आहे. ही समिती जिल्हा परिषदेत येणार असून जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेणार आहे. पंचायत राज समिती 2008-09 व 2011-12 चा लेखा परिक्षण करणार आहे. 2012-13 च्या वार्षीक प्रशासन अहवाल या विषयांवर प्रामुख्याने जिल्हा परिषदेचा आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेतील विविध योजनांचा घेतला जाणार आढावा
त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत पुर्वतयारी सुरु असुन त्यांची आढावा बैठक जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी घेतली. सीईओंच्या दालनात दुपारी 3 ते 3.30 यावेळत आढावा बैठक पार पडली. जिल्हा परिषदेअंतर्गत विभागप्रमुखांची कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. विविध योजना व लक्ष याच्या आढावा घेण्यात आला. तसेच प्रत्येक योजनेची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती अद्ययावत करण्याची सुचना देण्यात आली. बैठकीला अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्यासह इतर विभागप्रमुख उपस्थित होते.