बोदवड : बोदवड पंचायत समितीची स्थापना 1 जानेवारी 2010 ला झाली. परंतु 2002 मध्ये पहिली पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक झाली. बोदवड पंचायत समितीच्या अंतर्गत चार पंचायत समितीचे गण व दोन जिल्हा परिषद गट आहेत. बोदवड पंचायत समितीचे पूर्वीचे नाडगाव, बोदवड, मनुर बु॥ व साळशिंगी असे चार होते, मात्र बोदवड नगर पंचायत झाल्यामुळे बोदवड गण बरखास्त होऊन नवीन नाडगांव, मनुर बु॥, शेलवड व साळशिंगी असे गण रचना करण्यात आली.
असे आहे आतापर्यंतचे सत्ता समीकरण
स्थापनेपासून बोदवड पंचायत समितीवर भाजपाची सत्ता होती. प्रथम सभापती होण्याचा मान विद्यमान जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा राणे यांना मिळाला होता. दुसर्या पंचवार्षीक निवडणूकीत राष्ट्रवादीची सत्ता होती काँग्रेसच्या प्रमिला जंगले तर राष्ट्रवादीच्या भारती सोननी यांनी सभापती पद भूषविले. सध्या भाजपाची सत्ता असून प्रथम सभापती हरीभाऊ वरकड तर दुसरी टर्म मुक्ताबाई पाटील या अडीच वर्षापासून सभापती आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या बोदवड गणातील पंचायत समिती सदस्या शगुप्ताबी शेख सलीम यांना भाजपाने उपसभापती पद दिले होते. दरम्यान सभापती पदासाठी कोणताही पक्ष कोणतीही तडजोड करण्यास तयार आहे. असे आजवरच्या सत्ता बदलातुन दिसून येत आहे.
कामे पूर्ण करण्याची मागणी
पंचायत समिती सदस्यांनी गेल्या पाच वर्षात शेष फंडातून व इतर उपकर निधीतून कामे केल्याचे दिसून येत नाही. बोदवड मधील भजेगल्ली ते हिरवा तलाव, फत्तेराज वेल्डींग ते जामठी रस्ता कैकाडी वस्तीत केलेला शेष फंडातील हा एकमेव रस्ता व शेलवड येथील जामठी रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणारा वाघारी रस्ता हा एकमेव रस्ता पंचायत समिती सदस्यांनी पाच वर्षात यावर्षी शिरसाळा गावांत सभापती मुक्ताबाई पाटील यांनी केलेला रस्ता हेच तीन कामे दिसून येत आहे. इतर गावांत शेष फंडातील कामाचा फलक कुठेही दिसून येत नाही.