पंचायत समितीच्या शासकीय वाहनाला अपघात : अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

Panchayat Samiti government vehicle accident :  Amalner group development officer killed यावल : अमळनेर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे ठार झाले आहेत तर चालक जखमी झाला आहे. चौधरी हे चालकासह नाशिक येथे शासकीय कामाने निघाल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

ट्रकवर आदळले वाहन
समजलेल्या माहितीनुसार, बुधवार, 23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी हे चालकासह यावल येथून नाशिककडे शासकीय वाहन (एम.एच.19 डी.व्ही.4199) ने कामासाठी जात असताना अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीला अपघात झाला. त्यात चौधरी हे जागीच ठार झाले तर गाडीवरील चालकाला किरकोळ दुखापत झाली. भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याची प्राथमिक माहिती आहे. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार होता शिवाय यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता.