पंजाबचा दणदणीत विजय

0

मोहाली । आयपीएलच्या दहाव्या मोसमातील 36व्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने पंजाबला फक्त 68 धावांचे लक्ष देवून सर्व बाद झाले होते. यात पंजाबने 68 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करतांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अवघ्या 7.5 षटकात कोणीही बाद न होता 68 धावा काढून विजयाचा झेंडा रोवला. पंजाबकडून मार्टीन गुप्टील (50) आणि हसीम अमला (16) यांच्या भागीदारीनेच आजचा सामना जिंकला. विशेष म्हणजे पंजाब जिंकल्यानंतर मार्टीन गुप्टीलचेही अर्धशतकही पुर्ण झाले होते.

पंजाबने दिल्लीचा उडविला धुव्वा : पंजाब संघातील संदीप शर्माने चार षटकात चार विकेट घेतल्यामुळे जिंकण्याची संधी मिळाली, त्याच्या पाठोपाठ अक्षर पटेल आणि वरुण अ‍ॅरॉन यांनी अनुक्रमे 4, 2 षटकांत प्रत्येकी दोन बळी घेण्यात यशस्वि ठरलेत, कर्णधार ग्लेन मॅक्सवेल व मोहित शर्मा यांनी एक एक विकेट घेवून दिल्ली अरडेविल्सला 17.1 षटकात 67 धावा काढून लवकरच तंबूत पाठविण्यात यश आले.

दिल्लीच्या धावा
सुरूवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून दिल्ली डेअरडेविल्सला फलंदाजी साठी पाचारण केले होते. यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या दिल्ली डेअरडेविल्स संघाने पंजाब समोर अक्षरशः नांगी टाकली. दिल्लीचा संपूर्ण संघ 17.1 ओव्हरमध्ये केवळ 67 धावाकरून सर्व बाद झाले होते. 1-1 (सॅम बिलिंग्स- 0), 7-2 (संजू सैमसन- 5), 22-3 (श्रेयस अय्यर- 6), 25-4 (करुण नायर- 11), 30-5 (ऋषभ पंत- 3), 33-6 (क्रिस मॅरिस- 2), 59-7 (कोरी अँडरसन- 18), 62-8 (कागिसो रबाडा- 11), 67-9 (मोहम्मद शमी- 2) आणि 17-1 (शाबाज नदीम- 0) आणि अमित शर्मा नाबाद 4 रन याप्रमाणे मालिकेतील धावा काढले आहे.