नवी दिल्ली । पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असणार्या उत्तर प्रदेशासह गोवा, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये कमळ फुलणार असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये मात्र भाजपचे पानिपत झाले असून याठिकाणी काँग्रेस आणि आपमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
पाच राज्यांच्या या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चर्चा होती. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि वडिल मुलायम सिंग यादव यांच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवला. त्यानंतर भाजपला राज्यात रोखण्यासाठी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील 11 मंत्र्यांनी मोदींचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वाराणसीत तीन दिवस तळ ठोकला होता. त्यात शेवटच्या टप्प्यातील मतदानाला एक दिवसाचा अवधी असताना राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने सैफुल्लाह या दहशतवाद्याचा केलेला खातमा, त्यामुळे उत्तर प्रदेशात लोकांचा कल कुठे असणार याची उत्सुकता होती. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशातील जनमत भाजपच्या बाजुने झुकलेले पहायला मिळते. विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपच्या पारड्यात 185 जागा पडणार असा अंदाज आहे. सत्ताधारी असलेली समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला 124 आणि मायावतींच्या बहुजन समाजवादी पार्टीला 86 जागा मिळतील असा अंदाज आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]
विधानसभेच्या इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तराखंड , गोवा आणि मणिपुरमध्येही भाजप सत्तेच्या जवळ जाणार असल्याचे चित्र आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या राज्यात साधारपणे दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याचा इतिहास आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला यावेळी 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर पाच वर्षांच्या कालावधीनंतर भाजप 45 आमदारांसह राज्यात सत्तास्थापन करेल अशी चिन्हे आहेत. गोव्यात सत्तास्थापनेसाठी अपक्शांची मदत घ्यावी लागेल असे चित्र आहे. राज्यात भाजपला 17 आणि काँग्रेसला 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्शांना आपल्याकडे खेचण्यासाठी राज्यात घोडेबाजार रंगु शकतो. मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकते. राज्यातील 60 जागापैंकी भाजपच्या पदरात 30 जागा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 16 आणि इतर 14 असे इकडचे समीकरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकीकडे चार राज्यांमध्ये चौफेर उधळलेला भाजपचा वारू पंजाबमध्ये मात्र आम आदमीच्या झाडुपूढे झुकल्याचे चित्र आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. त्यात काँग्रेसला 58, आम आदमी पार्टीला 53 तर भाजप आणि अकालीदल आघडीला केवळ सात जांगावर समाधान मानावे लागेल अशी परिस्थिती आहे.