पंजाबराव बँकेला 9 कोटींचा गंडा;35 जणांवर गुन्हे दाखल

0

वर्धा । वर्ध्याच्या पंजाबराव अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेला 9 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तत्कालिन बँक मॅनेजर आणि महाराष्ट्र वखार महामंडळाच्या भांडार अधीक्षकांचाही समावेश आहे.

सफाईच्या नावाखाली धान्यसाठा हलवला वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये धान्य साठवून त्या पावतीच्या आधारावर बँकेकडून कर्ज उचलण्यात आले. मात्र, सफाईच्या नावाखाली 70 टक्के धान्यसाठा गोडाऊनमधून हलवण्यात आल्याचं निष्पन्न झाले आहे. हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर बँकेचे निलंबित मॅनेजर अशोक झाडेसह 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली. या बँकेचे अधिकारी संजय वानखेडे यांनी आत्महत्या केली होती. त्यामागे हेच प्रकरण कारणीभूत होतं का? असा सवाल उपस्थित केला जातोय.