पंडितराव कॉलनीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव । आईला फ्युजची तार आणण्यासाठी पाठवून तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 वाजता आरएमएस कॉलनी परिसरातील पंडितराव कॉलनीत घडली. योगेश प्रकाश पाटील (वय 27) असे मयत तरूणाचे नाव असून त्याने लिहीलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मात्र, त्यात त्याने फक्त आईची माफी मागितली असून त्याने आत्महत्तेचे कारण स्पष्ट केलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फ्युज वायर घेण्यासाठी पाठविले आईला
गेल्या काही पाच महिन्यांपासून योगेश हा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत दुरूस्तीचे काम करीत होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी योगेश घरात त्याच्या नेहमीच्या डायरीवर लिखाण करीत बसलेला होता. त्याचवेळी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याची आई घरी आली. त्याने आईला घराचा फ्यूज उडालेली असून त्यासाठी लागणारी वायर बाजुच्यांकडून आणण्यासाठी सांगितली. त्यामुळे कल्पना पाटील या वायर घेण्यासाठी गेल्या. त्या ठिकाणी ओळखीचे भेटल्याने त्यांच्याशी गप्पा मारत त्या उभ्या राहिल्या. त्यानंतर दुकानावर साखर घेण्यासाठी गेल्या. सायंकाळी 6.45 वाजता योगेशचे वडील प्रकाश पाटील हे कामावरून घरी परत आले. तर समोरचे दृश्य बघून त्यांची शुद्धच हरपली. त्यांचा मुलगा योगेश याने प्लॉस्टिकच्या पॅकींग वायरने छताला गळफास घेतलेला होता. त्यांनी आरडा ओरड केली. ते ऐकूून आई सुद्धा धावत आली. त्यांना तर समोरचे चित्र बघून भोवळ आली. शेजारच्यांनी योगेशला तत्काळ खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.