पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणजे पॉलिटिक्स ऑफ फिलॉसोफी

0

मुंबई | पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर ‘पॉलिटिक्स ऑफ फिलॉसोफी’ असे करता येईल तर नानासाहेब देशमुख यांचे वर्णन ‘पॉलिटिक्स ऑफ प्रोजेक्ट’ आणि बाळासाहेब देसाई यांचे वर्णन ‘पॉलिटिक्स ऑफ परफोर्मन्स’ अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्योदयाचे प्रणेते जेष्ठ विचारवंत स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय, जेष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व लोकनेते स्व. दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचर्चेत शुक्रवारी आमदार आशिष शेलार यांनी भाग घेतला व या प्रस्तावाला समर्थन देत या तिन्ही थोरपुरुषांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, शुक्रवारी देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, आम्हाला सर्वसामान्यपणे एक प्रश्न विचारला जातो की तुमचा विचार काय? हिंदुत्ववादी या आमच्या विचाराचा खरा अर्थ समजून घेतला जातोच असे नाही. पण शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन कार्याचा गौरव केला जात आहे, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार काय आहे विकासाचा आणि मानवतेचा विचार घेऊन हिंदूत्व भारतीय जनता पक्ष मांडतो आहे, हे लक्षात येईल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी हा विचार आम्हाला दिला त्याच विचारावर हा पक्ष चालतो आहे. पंडित दीनदयाळ याच्या विचारांचे प्रतिक म्हणून एखादी व्यक्ती पहायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यावे लागेल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हे सरकार हे ही पंडितजींच्या विचारांचे मुर्तीमंत उदाहरण आहेत. पंडितजी यांच्याकडे उत्तम शिक्षण होते तरीही त्यांनी वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, शिक्षण बाजूला ठेऊन प्रचारक म्हणून निष्ठेने काम केले ते प्रचारक असले तरी निवडणुकीच्या राजकारणाचा विचारही त्यांनी नेमकेपणाने मांडला ते संघटक असले तरी विचारवंतही होते. त्यांनी विदेशात शिक्षण घेतले नसले तरी गरीब माणसाचे अर्थकारणातील स्थान आणि अर्थशास्त्राचा विचारही त्यांनी मांडला. असा विरोधाभास वाटावे असे पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वात होते. त्यांनी कामगार हिताचे अत्यंत मौलिक विचार मांडले. वास्तवात ते ट्रेड युनियन मध्ये काम करणारे नव्हते तरीही सर्वसामान्य कामगाराच्या जीवनपद्धती आणि विकास यांचे वैचारिक विवेचन त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. ते शुक्रवारीही उपयुक्त ठरावे असे आहे. राजकारणात जेव्हा संख्याबळ की विचार असा पेच निर्माण होतो त्यावेळी संख्याबळाच्याच बाजूने सर्वसाधारणपणे निर्णय घेतला जातो. मात्र जनसंघाच्या राजस्थान मधील आमदारांनी जमीनदार आणि भूमिहीन असा पेच निर्माण झाल्यवर ९ पैकी ७ आमदारांनी जमीनदारांची बाजू घेतली. त्यावेळी पंडितजींनी ७ आमदारांना पक्षातून काढून टाकले असा विचारांशी कधीही तडजोड न करणारे पंडितजी होते. त्यांनी छोट्या छोट्या उद्योगांचा विकास झाला पाहिजे असा विचार मांडला त्यातूनच शुक्रवारी स्टार्टअप इंडिया, स्कील इंडिया, मुद्रा लोन अशा विविध योजना आकारास आल्या आणि त्या यशस्वी झाल्या असे सांगत त्यांनी पंडितजींचा विचार कामगार वर्गाच्या हिताचा कसा होता याबाबत विवेचन केले, तर पंडितजींना महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल विशेष आधार आणि प्रेम होते जनसंघाचे अधिवेशन मुंबईत जेव्हा ओव्हल मैदानात झाले त्यावेळी त्यांनी आचार्य अत्रे आणि मारुती माने यांचा विशेष सत्कार केला होता, असे सांगत आमदार आशिष शेलार यांनी पंडितजींचा विचार पॉलिटिक्स ऑफ फिलॉसोफी ही शुक्रवारीच्या परिस्थितीत दिशा दर्शक आहे असेही त्यांनी नमूद केले.