राज्यभरातील भाविकांच्या गर्दीमुळे गैरसोय होणार कमी
भुसावळ- आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असल्याने भाविकांची गैरसोय टळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 01155 न्यू अमरावती ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी 17 व 20 जुलै धावणार आहे तर 01153 ही गाडी खामगाव ते पंढरपूर दरम्यान 18 व 21 जुलै रोजी धावेल. परतीच्या प्रवासात 01156 ही गाडी पंढरपूर ते अमरावती ही गाडी 18 व 24 जुलै रोजी तसेच 01154 ही गाडी पंढरपूर ते खामगाव दरम्यान 19 व 25 जुलै रोजी सुटणार आहे. रेल्वे प्रवाशांना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.